अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचा इशारा
ओझोन थराची जाडी कमी होत असल्यामुळे ॲन्टार्टिक इथं ओझोन छिद्राचं सरासरी आकारमान वाढत आहे. यंदा ७ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या छिद्रानं २ कोटी ३० लाखाहून अधिक चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलं आहे. दक्षिण गोलार्धावर असलेला हा ओझोन थर गेल्या वर्षीपेक्षा किंचित कमी झाल्याचं नासा या अमेरिकेच्या अवकाश संस्थेच्या भू विज्ञान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ प़ॉल न्यूमन यांनी सांगितलं. ओझोन थरामुळे पृथ्वीचं सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण होतं. हा थर दर सप्टेंबरला पातळ होत असल्यामुळे हे छिद्र तयार झाल्याचं ते म्हणाले.
