१७ वर्षाखालच्या महिला फूटबॉल विश्वचषक स्पर्धेचं ओदिशामध्ये उद्घाटन
भुवनेश्वर, दि. ११ : १७ वर्षाखालच्या महिला फूटबॉल विश्वचषक स्पर्धेला आज ओदिशामधे सुरुवात झाली. मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेचं यजमानपद भूषवताना भारताला अभिमान वाटत आहे. या स्पर्धेत फुटबॉलचा सोहळा, तसंच भारताच्या आतिथ्याचा अनुभव सहभागी संघांना मिळेल, असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला. भुवनेश्वरमधे कलिंगा स्टेडिअमवर आज झालेल्या पहिल्या सामन्यात ब्राझिलनं मोरोक्कोवर १-० अशी मात केली.
