ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर
नाटककार विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ नाटककार आणि पटकथा लेखक सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. नामांकित चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते येत्या पाच नोव्हेंबर या रंगभूमीदिनी सांगली येथे हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. शाल, श्रीफळ, गौरव पदक आणि रोख पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे
