राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नवी दिल्ली, दि. ५ : पारदर्शकता आणि जन भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांचे सर्व पुरस्कार एका छत्राखाली एकत्र आणण्यासाठी सरकारने एक सामायिक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) विकसित केले आहे. हे पोर्टल प्रत्येक नागरिक किंवा संघटनेला केंद्र सरकारद्वारा स्थापन विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांना नामनिर्देशित करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
सध्या, पुढील पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी खुल्या आहेत:
- पद्म पुरस्कार- अंतिम तारीख १५/०९/२०२२
- डिजिटल इंडिया पुरस्कार २०२२ – अंतिम तारीख १५/०९/२०२२
- राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट वनीकरण पुरस्कार २०२२ – अंतिम तारीख ३०/०९/२०२२
- राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२२ – अंतिम तारीख ३०/०९/२०२२
- राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ – अंतिम तारीख १५/०९/२०२२
- नारी शक्ती पुरस्कार २०२३ – अंतिम तारीख ३१/१०/२०२२
- सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२३ – अंतिम तारीख ३०/०९/२०२२
- जीवन रक्षा पदक – अंतिम तारीख ३०/०९/२०२२
अधिक माहितीसाठी आणि नामांकनासाठी, कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या (https://awards.gov.in).
