नाशिक रेल्वे स्थानकासह राज्यातल्या ७ रेल्वे स्थानकांमध्ये रुग्णालय आणि बाह्य रुग्ण विभाग सुरु केला जाणार
नाशिक : नाशिक रेल्वे स्थानकासह राज्यातल्या ७ रेल्वे स्थानकांमध्ये रुग्णालय आणि बाह्य रुग्ण विभाग सुरु केला जाणार आहे. नाशिक रोड इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रेल्वे प्रवासा दरम्यान हृदयरोग, रक्तदाब आणि अन्य व्याधी असलेल्या रुग्णांना अनेकदा तातडीची वैद्यकीय मदत लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकांमध्ये २४ तास ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.