दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २९ वर
अहमदाबाद: गुजरातमधे बोताड जिल्ह्यात विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २९ वर पोचली आहे. त्या व्यतिरिक्त ४५ हुन अधिक लोकांना उपचारासाठी भावनगर आणि अहमदाबादला स्थलांतरित करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांमध्ये बोताड आणि अहमदाबाद जिल्ह्यातल्या खेडुतांचा समावेश आहे.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारनं तीन सदस्यांची समिती नेमली असल्याची माहिती, गुजरातचे गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यांनी दिली. ही समिती या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांची चौकशी करून त्याबाबातचा अहवाल तीन दिवसात सादर करणार असल्याचं संघवी यांनी सांगितलं.
