केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर आणि सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेनेची कवायत तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर, दि. २६ : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-कोल्हापूर आणि सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज २६ जुलै २०२२ (मंगळवार) रोजी कारगिल दिनाच्या निमित्ताने रॅली, राष्ट्रीय छात्र सेना कवायत, स्पर्धांचे पारितोषिक वितरण, मार्गदर्शन असा कार्यक्रम संपन्न झाला.

यानिमित्ताने काल सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निबंध तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्र सेनेच्या ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एस. सयाना प्रमुख पाहुणे म्हणून तसंच अनेक आजी आणि माजी सैनिक उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि त्याग या विषयांवर लघु नाटिका प्रस्तूत केल्या. त्यांना उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीनं झाली. यानंतर कारगिल विजय दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पुरस्कार वितरण करण्यात आलं. कार्यक्रमानंतर कर्नल डी एस सयाना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के. डी. पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
