अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा ताबा राष्ट्रीय तपास संस्थेकडे
अमरावती, दि.५ : अमरावती इथल्या औषध व्यवसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा ताबा राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए कडे सोपवण्यात आला आहे. शेख इरफान सह सातही जणांना एनआयएची कोठडी देण्याचा निर्णय काल अमरावती न्यायालयानं दिला. येत्या 8 जुलै किंवा त्यापुर्वी या आरोपींना एनआयएच्या मुंबई न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणांत शामीम अहमद या आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. गेल्या 21 जून रोजी तीन जणांनी उमेशवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला पाठिंबा देणारी पोस्ट समाजमाध्यमात प्रसारित केल्यामुळे उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला झाला असल्याचं तपासादरम्यान समोर आलं.
