महाराष्ट्रासह चार राज्यांतील १६ पैकी आठ राज्यसभेच्या जागांवर भाजपाचा विजय, तर काँग्रेसला पाच जागा तर शिवसेना-राष्ट्रवादी ला प्रत्येकी एक जागा
चारही राज्यांचे निकाल आज पहाटे जाहीर झाले. क्रॉस व्होटिंग आणि नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारींमुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आठ तासांहून अधिक काळ मतमोजणी थांबवण्यात आली.
मतमोजणी लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. क्रॉस व्होटिंगचा आरोप करत आणि मतांना अपात्र ठरवण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
