शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला… आशिष शेलार
मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशिष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.
आशिष शेलार ट्विटमध्ये असे म्हणाले की,
शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय?
शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शुन्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?’
दरम्यान, आशिष शेलार यांनी केलेल्या या ट्विटला मनसे काय उत्तर देते हे पाहणे मज्जेशीर ठरणार आहे.
शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय?
शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शुन्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?#ChowkidarकेSideEffects— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 1, 2019
