मुंबईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर येत्या १५ दिवसातं कडक कारवाई
मुंबई: मुंबईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर येत्या १५ दिवसातं कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईत दुचाकीस्वारांसाठी आणि त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट सक्ती आहे. तरी ते देखील या नियमाचं पालन केलं जात नाही. या नियमाचं पालन न करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड तसंच वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेलं लायसंस तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याची तरतूद आहे. या नियमांची सक्तींने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहितीही या पत्रकात देण्यात आली आहे.
