चांदोली व्याघ्र प्रकल्प अभयारण्यात बिबटे, गवा इत्यादि सह ३०८ प्राण्यांची नोंद
सांगली: सांगली जिल्ह्यातल्या चांदोली व्याघ्र प्रकल्प अभयारण्यात पाणवठ्यावर येणाऱ्या ३०८ प्राण्यांची नोंद झाली आहे. बिबटे, गवा, रानडुक्कर, सांबर, साळिंदर, हनुमान वानर, पिसोरी, भेकर, अस्वल, रानकुत्रे, ससा या प्राण्यांचा यात समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. यावेळी पंधरा वेगवेगळ्या वन्य प्रजातीच्या प्राण्यांचं दर्शन निसर्गप्रेमींना झालं. चांदोली वनपरिक्षेत्रा अंतर्गत झालेल्या या प्राणी गणनेत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातले स्वयंसेवक सहभागी झाले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत आणि उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
