दक्षिण आफ्रिकेत भीषण चक्रीवादळामुळे हाहाकार; सुमारे ४०० जणांचा मृत्यु
दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादळानंतर आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४०० वर पोहोचली असून, पाच दिवसानंतरही अनेक नागरिक बेपत्ता असल्याचं आढळत आहे. दुर्दैवाने मृतांची संख्याही वाढत असल्याचं, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या पुरामुळे जवळपास ४१ हजार लोक बाधित झाले आहेत. पूर्वेकडील क्वाझुलु-नताल राज्याच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसला असून,अनेक पूल,घरं कोसळली तसंच आफ्रिकेतील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले डर्बन बंदरही उद्ध्वस्त झालं आहे.
Source-AIR
