शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे – आशिष शेलार
मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. “शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” अशा शब्दात शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!! “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”.
यावेळी #ChokidarकेSideEffects असा हॅशटॅग वापरला आहे.
आशिष शेलार यांच्या टिकेला राज ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी "फक्त लढ" असे म्हटले.!!
"शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे"#ChokidarकेSideEffects— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 28, 2019
