अन्यायकारक आदेशा विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट
उरण, दि.१८(विठ्ठल ममताबादे): प्रधान सचिव(प. दु. म) यांनी १२० हॉर्स पॉवर पेक्षा जास्त अश्वशक्ती असणाऱ्या मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर करू नये तसेच मंजूर परतावा वितरण करू नये या दिलेल्या अन्यायकारक आदेशाविरुद्ध काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची भेट घेऊन मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या दालनात बैठक घेण्यासंबंधी विनंती केली. यावेळी ऑल इंडिया फिशरमेन काँग्रेसचे उपाध्यक्ष रामदास संधे, कोकण अध्यक्ष मार्तंड नाखवा, बी. वाय. पगारे इ. मान्यवर उपस्थित होते. आपली समस्या मांडत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन दिले. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन नाना पटोले यांनी उपस्थितांना दिले आहे.
