सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित
राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच हा निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांनी १४ फेब्रवारीपासून आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
मात्र राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव वल्सा नायर यांनी अण्णा यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं.
