उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
रत्नागिरी/मुंबई: राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राजभवन इथं नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबारहॉलचं उद्घाटन उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह निवडक निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. तर परवा १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे.
