Photo : दीपिकाचे ऍसिड हल्ल्यातील पीडितेच्या जीवनावर आधारित चित्रपटातील ‘हे’ रूप पाहिलंत का?
दीपिका पदुकोण ही ‘छपाक’ या चित्रपटामधून एका ऍसिड हल्ल्यातील पीडितेच्या रुपात सर्वांसमोर येणार आहे. या चित्रपट तिचे नाव ‘मालती’ आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाची कथा ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका बरोबर विक्रांत मेस्सी हा प्रमुख भूमिकेत आहे.