उरण येथे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा बहरली
उरण, दि.३(विठ्ठल ममताबादे): उरण येथील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित युवा महोत्सव २०२२च्या काव्य-स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी-कवयित्रींनी उस्फुर्त भाग घेतला. आजी किंवा आजोबा, शेतकरी व पोलीस या दिलेल्या तीनही विषयांच्या अर्थपूर्ण-बहारदार रचनांसह सर्वांनी उत्तम सादरीकरण केले. स्पर्धेचे अध्यक्षस्थान युवा महोत्सवाचे अध्यक्ष महादेव घरत यांनी भूषविले. यावेळी अनेक मान्यवर, महोत्सवाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि काव्य-रसिकांची उपस्थिती लाभली. परीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रातील मान्यवर गुरुदत्तजी वाकदेकर आणि अनुजजी केसरकर यांनी स्पर्धेचे चोख परीक्षण केले. काव्य-स्पर्धेचे नियोजन कवी-संजय होळकर, कवी – भ. पो. म्हात्रे आणि स्पर्धा प्रमुख-निवेदक-मुख्य सूत्रसंचालक कविश्री अरुण द. म्हात्रे यांनी सुबद्ध आखणीसह उत्तम प्रकारे केले. नियोजन व निवेदनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
काव्य स्पर्धेचा निकाल:
प्रथम क्र.- प्रदीप दत्ताराम बडदे, द्वितीय क्र.- हेमाली बगाराम म्हात्रे, तृतीय क्र.- अमोल रामचंद्र गोळे, चतुर्थ क्र.- सुचित्रा अशोक कुंचमवार, उत्तेजनार्थ –१- रमेश नारायण पाटील,२ – अंजली अनंत कोळी, ३- समीर शंकर म्हात्रे,४ – अनिल विनोद भोईर असे एकूण आठ विजेते क्रमांक काढण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागधारकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष, स्पर्धा प्रमुख व संयोजकांनी सर्व मान्यवरांचे, विजेत्यांचे, कवी-कवयित्रींचे आणि काव्य-रसिकांचे आभार मानले.
