औरंगाबाद शहरात इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून झाले सुरु
औरंगाबाद, दि.२०: औरंगाबाद शहरात इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरु झाले. शाळांमध्ये कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनानं दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं राज्यातल्या शाळांमध्ये प्राथमिक वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. त्यानंतर ठीकठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं संबंधित जिल्ह्यांतल्या कोरोना स्थितीचा आढावा घेऊन प्राथमिक वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात पुणे शहरातल्या शाळांचे प्राथमिक वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू करण्यात आले आहेत.
