नीरव मोदीला लंडनमध्ये अटक
पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला आज लंडन येथून अटक करण्यात आली आहे.
भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदी विरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्याला काही वेळात लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती.
नीरव मोदी सध्या लंडनमध्ये ऐषोरामी जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. भारताने नीरव मोदीलाभारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे.