रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी
रत्नागिरी, दि.२१: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पाच जागा सत्तारूढ सहकार पॅनेललला, तर दोन जागा विरोधी सदस्यांना मिळाल्या आहेत. बँकेतल्या संचालकांच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलला यावेळी दोन जागा गमावाव्या लागल्या आहेत.
Source-AIR
