Raj Thackarey
राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: मंगळवारी रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे विधान त्यांनी आपल्या भाषणात केले होते.
मंगळवारी संध्याकाळच्या जोशपूर्ण भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
