मुंबईत कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आल्याने घेण्यात आला निर्णय
मुंबई, दि.१: मुंबईत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग आजपासून खुली करून मुंबई महानगरपालिकेनं लहान मुलांना दिवाळीची खास भेट दिली आहे. मुंबईत कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेतल्याचं उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितलं.
उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ तर प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी ६ ते ८.३० या वेळात खुलं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील काही वर्षांपासून पेंगविन पाहण्यासाठी येणार्या आबाल-वृद्धांची येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.
