उरण तालुक्यातील ‘आम्ही पिरकोनकर’ समूहा तर्फे गड किल्ले स्पर्धा
उरण, दि.२९(विठ्ठल ममताबादे): श्री छत्रपती शिवरायांच्या गडकिल्यांचे बीज छोट्या छोट्या मित्रांमध्ये, बालमनातच रुजावे यासाठी उरण तालुक्यातील ‘आम्ही पिरकोनकर’ समूह तर्फे उरण तालुका मर्यादित गड किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकांनी ३/१०/२०२१ पूर्वी नोंदणी करावयाची आहे. किल्ले स्पर्धेकांनी स्वतः बनवायचे असून इको फ्रेंडली किल्ल्यांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही पिरकोनकर समूहाचे चेतन गावंड – 9819759105, समीर गावंड – 9920848156, विनायक गावंड – 9821594243, तुषार म्हात्रे – 9820344394, प्रमोद पाटील – 9167230113 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आम्ही पिरकोनकर समूहातर्फे करण्यात आले आहे.
