साकीनाका परिसरातील पीडितेच्या नातेवाईकांची घेतली भेट
मुंबई, दि.१२: राज्य सरकारने तत्काळ महिला आयोगाच्या सदस्यांची नेमणूक करावी आणि पीडितेच्या नातेवाईकांना निर्भया फंडातून मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील पीडितेच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर, त्या बोलत होत्या.
राज्यातील कायदा सुव्यस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांच्या उपस्थिती संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलेलं वक्तव्य दुर्देवी असून या वक्तव्याची दखल घेतली आहे. दिल्लीत जाऊन याप्रकरणी कारवाई संदर्भात चर्चा करू असंही त्या म्हणाल्या.
Total Source – AIR
