राज्यातील शाळा सुरु करण्यास बालरोग तज्ज्ञांच्या कोविड कृती पथकाचा हिरवा कंदील
आरोग्य विभागातील आणि या कृती पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त ४ तासांच्या अवधीसाठी आणि दोन पाळ्यांमध्ये शाळा सुरु केल्या जाव्यात, तसंच ऑफलाईन शाळा दिवसाआड सुरु व्हावी म्हणजेच आज ऑफलाईन तर उद्या ऑनलाईन वर्ग घेतले जावेत अशी शिफारस कृती पथकाने केली आहे.
वर्गात एकावेळी जास्त संख्येने विद्यार्थी नसावेत यादृष्टीनं ही व्यवस्था केली जावी त्याचबरोबर योग्य शारीरिक अंतर राखण्यासाठी आसन व्यवस्थेतही बदल करावेत, शिक्षकांसह शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाचा कोरोना लसींच्या दोन्ही मात्रांचा डोस पूर्ण करावा आणि शाळांमधील उदवाहनाचा वापर बंद केला जावा अशा शिफारशीही करण्यात आल्या आहेत. शिवाय शाळा सुरु करताच विद्यार्थ्यांवर विविध विषयांच्या शिकवणुकीची सक्ती न करता आधी नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिला जावा अशी अपेक्षा कृती पथकं व्यक्त केली आहे.
