केंद्र सरकारकडून राज्यांना आतापर्यंत लसीच्या ५६ कोटी ७६ लाख मात्रा वितरित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या ५६ कोटी ७६ लाख मात्रा वितरित केल्या असून ३ कोटींपेक्षा अधिक मात्रा त्यांच्याकडे तसंच खाजगी रूग्णालयात शिल्लक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच अजून ५ कोटी मात्रा उपलब्ध होणार असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
२१ जूनपासून लसीच्या मात्रा राज्यांना आणि केंद्रशासीत प्रदेशांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्यानंतर लसीकरणाला वेग आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
