टोकियो ऑलिंपिक २०२० मधे वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
टोकियो ऑलिंपिक २०२० मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे.
टोकियो २०२० ! ची यापेक्षा आनंदी सुरुवात असू शकत नाही, @mirabai_chanu च्या या धडाकेबाज कामगिरीने भारताची मान उंचावली. भारोत्तोलन प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन! तिच्या या यशाने प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल. असे त्यांनी पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.