आषाढीवारीच्या कालावधीत पंढरपूर शहरात एसटी व खाजगी बस सेवा बंद राहणार
पंढरपूर, दि.१६: आषाढी वारी कालावधीत पंढरपूर शहरात एसटी तसेच खाजगी बस सेवेवर १७ ते २५ जुलै दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहिर केले आहेत. यातून अत्यावश्यक सेवा देणार्यांना वगळण्यात आलं आहे. या काळात भाविकांनी तिथे दर्शनासाठी गर्दी केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
या कालावधीत भाविकांना पादुकांच्या दर्शनासाठी, श्री विठ्ठल मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि चंद्रभागेमध्ये स्नानासाठी मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
