केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा – एनईईटी(NEET) येत्या पाच सप्टेंबरला होणार असल्याचे वृत्त चुकीचे असून, असे कोणतेही पत्रक जारी केले नसल्याचे, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. संबंधितांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावर्षीची नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र पुन्हा निवडण्याची संधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरुन १२ ते १९ जुलै आणि २६ ते ३० जुलै अशा दोन टप्प्यात परीक्षा केंद्राची निवड करता येईल, असे आयोगाने सांगितले आहे.
