मुंबई विद्यापीठाच्या ३८ इमारतींना त्वरित ना हरकत आणि भोगवटा प्रमाण पत्र देण्याच्या राज्यपालांच्या सूचना
मुंबई, दि.१: मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँपसमध्ये बांधून पूर्ण असलेल्या ३८ इमारतींना ना हरकत आणि भोगवटा प्रमाण पत्र त्वरित देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यपाल कोश्यारी यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली आणि विविध विभाग आणि इमारतींची पाहणी केली. त्यानंतर राज्यपालांनी या सुचना केल्या.
या इमारती ना-हरकत प्रमाणपत्रा शिवाय पडून आहेत. ही राष्ट्रीय संपदेची नासाडी आहे. इमारतींमधील त्रुटी दूर करून लवकरात लवकर आवश्यक प्रमाणपत्र त्वरित वितरीत करावीत, असंही त्यांनी सांगितलं.
