‘कोवॅक्सिन’ तसेच ‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण नाही – केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली: कोवॅक्सिन तसंच कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला काहीही अडचण येणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना – डब्ल्यूएचओची मान्यता नसून, या लसी घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नसल्याचं, खोडसाळ वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं, जावडेकर यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी, कोरोना विषाणूच्या नव्या अवताराला इंडियन व्हेरियंट म्हटल्याबद्दल जावडेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
हा देशाचा अपमान असून, या प्रादुर्भावाविरोधातल्या लढाईचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने
