परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलीस निरीक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे १४ पानी पत्र देत तक्रार
अकोला, दि. २७: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लाचखोरी आणि खंडणीचे आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात आता एका पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत लेटर बॉम्ब टाकला आहे.
अकोल्यातील नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक असलेल्या भीमराज उर्फ भीमराव घाडगे या पोलीस अधिकाऱ्याने तब्बल १४ पानांचे तक्रार पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक, लाचलुचपत विभाग यांना पाठवलं आहे.
Source – AIR
