‘हे’ आहेत भारत बायोटेक च्या ‘कोव्हॅक्सिन’ चे दर
मुंबई, दि. २५: पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ने दोन दिवसांपूर्वी आपल्या कोव्हीशिल्ड या लसीचे दर जाहीर केले. या दरातील तफावतीवरून टीका-टिप्पणी सुरू झाली असतानाच दुसऱ्या बाजूला भारत बायोटेक कंपनीनेही आपल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे दर जाहीर केले आहेत.
भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लशीचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्यसरकारांना प्रतिमात्रा ६०० रुपये दराने लस मिळेल तर खाजगी रुग्णालयांना प्रतिमात्रा १२०० रुपये मोजावे लागतील.
निर्यातीसाठी कोव्हॅक्सिनचा दर प्रतिमात्रा १५ ते २० डॉलर्स निश्चित करण्यात आला आहे. जगातील इतर लसींच्या दरांशी तुलना करता भारत बायोटेक ची लस जास्त महाग आहे.
हे आहेत कोव्हीशिल्ड चे जागतिक दरपत्रक

