वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या एनआयएच्या विशेष पोलीस कोठडीत उद्यापर्यंत वाढ
मुंबई, दि. ८: मनसुख हिरण कथित हत्या प्रकरणी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या विशेष पोलीस कोठडीत उद्यापर्यंत वाढ केली आहे. त्याच बरोबर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्थेला वाझे याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
या बाबतीत सीबीआयने एनआयएशी समन्वयानं काम करावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. खंडणी वसुली प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी मुंबई उच्च न्यायालयानं या आधीच सीबीआयकडे सोपवली आहे.
