कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या अव्वलच
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत ८० लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
मात्र, राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल दिल्या.
कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
