९ वी ते १२ वीच्या वर्गांचा अभ्यासक्रम सीबीएसईच कमी करणार नाही
नवी दिल्ली: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ९ वी ते १२ वीच्या वर्गांचा अभ्यासक्रम कमी करणार नसल्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं, म्हणजेच सीबीएसईनं घेतला आहे.
सीबीएसईनं नवा अभ्यासक्रम प्रसिध्द केला असून गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमात झालेला बदल केवळ एकाच वर्षापुरता मर्यादित होता, असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे.
