उद्या सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामण लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प २०२१-२२
नवी दिल्ली, दि.३१: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३३ विधेयकं आणि पाच आर्थिक बाबी सादर केल्या जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. या संपूर्ण अधिवेशनात काळात २०२१-२२ साठीच्या अर्थसंकल्पाशी संबंधित कामकाज होईल, असं त्यांनी सांगितलं.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाज सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चा, महत्वाचं विधिविषयक कामकाजासह इतर कामकाज होईल. याशिवाय केंद्र सरकारनं काढलेल्या चार अध्यादेशांसंबंधीची विधेयकंही या अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
