बर्ड फ्लू अलर्ट: बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृत्यू
बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेतून प्राप्त झाला आहे. या रोगाचा प्रसार चिखली तालुका आणि इतर ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भानखेड इथल्या संसर्ग केंद्रापासून १ किलोमीटरचा परीसर हा बाधीत क्षेत्र, तर १ ते १० किलोमीटरचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे.
बाधीत क्षेत्रातल्या सर्व कोंबड्या, त्यांचं खाद्य, आणि अंडी यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश जलद कृती दलाला दिले आहेत. नागरिकांनी घाबरू न जाता सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Source – AIR
