कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा रद्द
नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरवण्यासाठी परवानगीचा अर्ज तहसीलदारांकडे केला होता, मात्र जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव थांबलेला नसल्यानं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यात्रेला परवानगी नाकारली.
