कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; निर्यातबंदी १ जानेवारी पासून मागे
कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे. विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जाहिर करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला दर मिळू शकतो असे जाणकारांचे मत आहे.
कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही बंदी उठवण्यासाठी आंदोलनही केले होते.
