२२ आणि २३ डिसेंबरला मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात
मुंबई: मुंबईच्या पाणी पुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीमुळे २२ आणि २३ डिसेंबरला मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. घाटकोपर, साकीनाकी परिसरात मात्र पाणी पुरवठा पुर्ण बंद राहिल. नागरिकांनी पाणी साठवून त्याचा माफक वापर करावा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
