‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण
मुंबई : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. ६ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे.