Mumbai_Suburban_Railway-Web
परळ टर्मिनसवर आजपासून प्रवाशांसाठी लोकल धावणार
मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या परळ टर्मिनसचे लोकार्पण केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या लोकार्पण सोहळयात मुंबई लोकलवरील ८० लाख प्रवाशांसाठी भविष्यात १८० सरकते जिने आणि १७० लिफ्टना मंजुरी देण्यात आली. कल्याण दिशेकडे १६ फेऱ्या आणि परळ दिशेकडे १६ फेऱ्या अशा एकूण ३२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. कल्याणहून परळ टर्मिनसकडे सकाळी ७ वाजून ९ मिनिटांना रवाना होणार आहे. तर शेवटची लोकल कल्याणहून ९ वाजून ५२ मिनिटांनी परळ टर्मिनसकडे रवाना होणार आहे.
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल फेर्या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत. दादरहून सुटणार्या सुमारे 50 टक्के लोकल परळ उपनगरीय टर्मिनसवरून सुरू करण्याचा विचार आहे, त्यामुळे मध्य रेल्वेवरील परळ टर्मिनसवरून सुटणार्या लोकल सेवांमुळे दादर रेल्वे स्थानकावर येणारा भार नक्कीच कमी होणार आहे.
