“गो कोरोना…नो कोरोना …” रामदास आठवलेंनी पुन्हा दिला नारा
मुंबई: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा “गो कोरोना गो” चा नारा दिला आहे. कोरोनाच्या देशात शिरकाव होण्याच्या प्रारंभी रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात ‘गो कोरोना कोरोना गो’ अशी आरोळी देत धम्माल उडवून दिली होती. यानंतर चक्क अनेकांनी या ओळींवर गाणी बनवली तर काहींनी टिकटॉक व्हिडिओ देखील बनवले होते. आता आठवले यांनी एक ट्विट करत लोकांना एकमेकांशी सुरक्षित अंतर राखत नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “गो कोरोना गो कोरोना
नो कोरोना नो कोरोना
कोरोना को मत डरोना
गर्दी टाळा
नियम पाळा
आणि कोरोना ला जाळा”
केंद्र सरकारने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत राज्य सरकारांनाही सांगण्यात आले आहे.
