Fighter Jet
भारताने पाकिस्तानचे एफ १६ लढाऊ विमान पाडले
भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केलेले पाकिस्तानचे ‘एफ-१६’ हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाने पाडल्याची बातमी समोर येत आहे.
जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. आज सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरल्यानंतर भारतीय हवाई दलाने हि कारवाई केली आहे. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.
नौशेरा भागात विमान कोसळले असून विमान कोसळत असताना एक पॅराशूटही दिसले. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या घटने नंतर देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
