अभिनेत्री कंगनाच्या अनधिकृत बांधकामाच्या कारवाईचं नाट्य अखेर थांबलं
मुंबई, दि. ९: अभिनेत्री कंगना राणावत ने शिवसेनेला ललकारल्यानंतर सेनेनेही तिला शिंगावर घेण्याचे ठरवले आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे प्रभागातर्फे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली. या संदर्भात काल सदर कार्यालयाला पालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. व आज अखेर या कार्यालयातील १२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
या बाबत कंगणाच्या वतीने तिच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तात्काळ रिट याचिका दाखल केली आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून सध्यातरी थांबवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर पर्यंत मुंबई व राज्यातील अनेक महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. पण ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सद्य स्थितीत चालू असेल तेथे पालिकेची भूमिका नेमकी काय असणार हे मोठं कोडं आहे.
