विधानपरिषद उपसभापती निवडणूक होणारच; निवडणूक बिनविरोध न होत असल्याबाबत अजित पवारांनी दर्शवली नाराजी
मुंबई, दि.७: विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या निलम गो-हे यांनी तर भाजपाच्या वतीनं भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्जदाखल केले आहेत.
सभापतीरामराजे नाईक निंबाळकर यांनी उद्या निवडणूक होणार असल्याचं आज विधानपरिषदेत जाहीर केलं होतं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांना सभापतींनी यावेळी दिल्या होत्या. विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा सदस्यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीसंदर्भात चर्चा झालीहोती.
मात्र कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी समंजस भूमिका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपर्क ठेवायला हवा होता, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. मात्र भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
