मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ वर केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.
